
पणजी, दि. 28 (जनसंवाद न्युज): दिवाळीच्या काळात प्रवाशांचा वेग वाढतो, याच पार्श्वभूमीवर गोव्यातील फ्लाय९१ या विमान कंपनीने पुणे-जळगाव आणि पुणे-गोवा दररोजची सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. फ्लाय९१ कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही सेवा २७ ऑक्टोबर २०२४ पासुन सुरू झाली आहे.
या दोन मार्गांवर रोजची उड्डाणे सुरू केल्याने महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आयटी, आणि शिक्षण केंद्र असलेल्या पुण्याशी संपर्क सुधारेल. यामुळे पुण्यातील लोकांना बाहेर प्रवास करण्यासाठी सोपे आणि थेट पर्याय उपलब्ध होतील.
पुणे-गोवा मार्गामुळे विध्यार्थी, पर्यटक आणि गोव्यातील व्यावसायिक कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी प्रवास करणे सोपे होईल. तसेच गोव्यात एमआईसीई (मीटिंग्स, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि प्रदर्शने) पर्यटनाला चालना देईल. पुणे ते जळगाव मार्गामुळे व्यापारी आणि विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोपे होणार आहे. या मार्गामुळे जळगावमधील प्रसिद्ध अजंता आणि एलोरा लेण्यांसारख्या जागतिक वारसा स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक आकर्षित होऊ शकतात.
दिवाळी, महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. या काळात प्रवास वाढतो कारण लोक सुट्टीचा उपयोग करून कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी किंवा सुट्टीचे नियोजन करण्यासाठी त्यांच्या वडिलोपार्जित घरांमध्ये परत जातात. या प्रवाश्यांसाठी ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.
पुणे-गोवा-पुणे आणि पुणे-जळगाव-पुणे या मार्गांवर दैनंदिन उड्डाणे सुरू केल्याने फ्लाय९१ लहान शहरांमधील प्रवास सुलभ करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. या सुधारित प्रवासामुळे फारसा विकास नसलेल्या या क्षेत्रांतील व्यापार आणि आर्थिक वाढीस मदत मिळेल, असे फ्लाय९१चे सीईओ मनोज चाको यांनी म्हटले आहे.
या मार्गांव्यतिरिक्त, फ्लाय९१ आठवड्यातून दोनदा पुणे-सिंधुदुर्ग मार्गावरही विमान सेवा चालवत राहील.
फ्लाय ९१ सध्या महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, आणि सिंधुदुर्ग यांच्यासोबत लक्षद्वीपमधील आणि हैदराबाद सारख्या शहरांनाही जोडते.