दैनिक लोकमतचे फोटोग्राफर सचिन पाटील यांना पत्रकारितेतील दर्पणकार पुरस्कार जाहीर

जळगाव, दि. 3 ( जनसंवाद न्युज): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील दहा पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दैनिक लोकमतचे फोटोग्राफर सचिन पाटील यांना यावर्षाचा दर्पणकार पुरस्कार जाहिर झाला असुन 6 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सचिन पाटील हे गेल्या 20 वर्षापासून मिडीया क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सुरूवातीला दैनिक गावकरी मध्ये फोटोग्राफीला सुरूवात केली. त्यानंतर गेले पंधरा वर्षांपासून ते लोकमत मध्ये कार्यरत आहेत. लोकमत मध्ये सलग तीन वर्ष त्यांना लोकमत अचिव्ह अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा अवार्ड महाराष्ट्रातुन निवडक फोटोग्राफरांनाच दिला जातो.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध व्याख्याते तसेच लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण १० पत्रकारांना ‘दर्पणकार’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
फोटोग्राफर :
सचिन पाटील, दैनिक लोकमत
प्रिंट मीडिया :
•चंद्रशेखर जोशी (तरुणभारत)
•सुनील पाटील (लोकमत),
•सुधाकर जाधव (दिव्यमराठी)
•चेतन साखरे (देशदूत)
इलेक्ट्रॉनिक मीडिया :
•किशोर पाटील (TV9 मराठी)
•संजय महाजन (साम TV )
•विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत),
डिजिटल मीडिया :
नरेंद्र पाटील, पुढारी (डिजिटल)
निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल)
तरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव व पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी,नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संघटने तर्फे करण्यात आले आहे.