
जळगाव, दि. 22 (जनसंवाद न्युज): राज्यातील ५५ लाख इमारत व इतर बांधकाम कामगारांना निवडणुकीच्या तोंडावर ५००० रू. दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) घोषणा करत कामगारांची फसवणुक करणाऱ्या भाजप आणि महायुती सरकारच्या फसवणुकीचा जाहीर निषेध करीत असल्या6चे पत्रकाव्दारे जळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने कळविले आहे.
मागील दोन महीन्यांपासून राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार राज्यभरात बोनस मागणी साठी आंदोलने करीत होती. कामगार मंत्री श्री सुरेश-भाऊ, खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर राज्यातील बांधकाम कामगार संघटनेने प्रचंड मोर्चा, इतर जिल्ह्यांतील बोनस मागणीसाठी हजारो कामगारांनी आंदोलने केली. आंदोलनामुळे राज्य सरकारने मुंबई, सांगली येथे कामगारीच्या शिष्ट मंडळासोबत झालेल्या चर्चेत राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळी भेट देऊन कामगारांची दिवाळी गोड करणार असल्याचे सांगितले, ५५ लाख कामगारांना दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) म्हणुन ५०००/- रु सर्व नोंदीत व नुतनीकरण रखडलेल्या कामगारांना निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करून कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणुक केली आहे. कष्टकरी ईमारत व इतर बांधकाम कामगारांची अशा प्रकारे क्रूर चेष्टा करणाऱ्या भाजप आणि महायुती सरकारच्या कृत्याचा जाहीर निषेध करावा. असे आवाहन जळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटना तर्फे कॉ. विजय पवार, काॅ. तापीराम भालेराव, कॉ. शोएब अली, अजिम अली, अनवर शाह हबीब शाह, आसिफ खान अजिम खान, श्रावण मोरे काॅ. अनिल सपकाळे, नवल सोनवणे, कॉ नानासाहेब ठाकरे यांनी केले आहे.