जळगावशैक्षणिक

जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ

जळगाव, दि. 21 ( जनसंवाद न्युज):  इयत्ता १०वी १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे.  या अनुषंगाने  राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण  (महिला) या संस्थेतील विविध व्यवसायाच्या शिल्लक जागांसाठी प्रवेश प्रक्रीयेत मुदवाढ देण्यात आली आहे.  दि.१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत मुदवाढ मिळाली असून आता उमेदवार राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरुन प्रवेश घेऊ शकतात.  प्रवेश प्रक्रिया सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु झाली आहे.
सदरच्या समुपदेशन फेरीसाठी दिनांक ३० ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे वरीष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

दिनांक २४ ऑक्टोबर  ते ३० ऑक्टोबर  या कालावधीत एकत्रित समुपदेशन फेरीमध्ये पूर्वी राहीलेले उमेदवार व नव्याने अर्ज सादर केलेले उमेदवार यांना प्रवेश घेता येणार आहे.
जास्तीत जास्त उमेदवारांनी आपला प्रवेश अर्ज भरण्यासाठी व निश्चीतसाठी संस्थेत संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button