स्वामिनारायण मंदिरात कोजागिरी पौर्णिमा होणार साजरी

जळगाव, दि.14 (जनसंवाद न्युज): जळगाव येथील स्वामिनारायण मंदिर येथे 17ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा दिवस मानला जातो. पौराणिक कथेनुसार हा दिवस माता लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांनी संपन्न असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात शिवाय या दिवशी श्रीकृष्णांनी वृंदावन धामात गोपिकां समवेद मोठा रासलेला करवल्याचे पुराणात उल्लेख आढळते.
भगवान स्वामिनारायण यांनी पंचाळा गुजरात या गावात संतांसोबत व हरिभक्त समवेत रासलीला करवल्याच्या श्रीमद सत्संगजीवन या ग्रंथात उल्लेख आढळतो, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. सर्वात जास्त तेजस्वी चंद्रप्रकाश असतो. या चंद्र प्रकाशातून अमृत वृष्टी होते अशी श्रद्धा असल्याने या दिवशी दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात व त्यात चंद्राची अमृतमय किरणे पडतात व हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. जळगावच्या श्रीस्वामिनारायण मंदिरात सायंकाळी ७ ते १० वाजेच्या दरम्यान शरद पौर्णिमा साजरी होणार असून त्यात रास दांडिया बालसभेच्या मुलांची विविध परवानगी कथांवर आधारित नृत्य गायन पारंपारिक वेशभूषेत होणार आहेत, याप्रसंगी अनेक संत मंडळी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सर्वांना दुधाचा प्रसाद वाटप कार्यक्रम होऊन शरद पौर्णिमा समारंभ संपन्न होणार, असे परमपूज्य गुरुवर्य गोविंद स्वामी पी.पी. शास्त्री नयन स्वामी कळवतात सर्व हरिभक्तांनी या दिवशी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन नयन स्वामी यांनी केले आहे.