
जळगाव, दि. 10 (जनसंवाद न्युज): खान्देशातील शिक्षणक्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासक श्री.राजेंद्र लखिचंद नन्नवरे यांची अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ.हेमा अमळकर आणि सचिव म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे नुकत्याच झालेल्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केशवस्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ.भरतदादा अमळकर यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली यात अध्यक्ष म्हणून श्री.राजेंद्र नन्नवरे ,उपाध्यक्ष – सौ.हेमलता अमळकर, सचिव – श्री विनोद पाटील, सहसचिव- श्री दिलीप महाजन, कोषाध्यक्ष – सौ. पल्लवी मयूर ,सह कोषाध्यक्ष – श्री.अक्षय शहा तर सदस्य म्हणून श्री.मुकुंद शानबाग, सौ.मीराताई शानबाग, श्री.गोपाल पलोड,सौ. कविता दीक्षित, डॉ.वैजयंती पाध्ये,डॉ.महेंद्र शिरुडे,डॉ.योगेश चौधरी,श्री.कुशल गांधी, श्री.तुषार कुकरेजा व श्री.मिहीर घोटीकर यांचा समावेश आहे.
या प्रसंगी डॉ.भरतदादा अमळकर,श्रीमती शोभाताई पाटील,श्री.सतिश मदाने,श्री.निळकंठ गायकवाड,श्री.अनिल भोकरे इ. मान्यवर उपस्थित होते.
श्री.राजेंद्र नन्नवरे, सौ.हेमा अमळकर आणि श्री.विनोद पाटील प्रारंभा पासून प्रतिष्ठानच्या जडणघडणीत योगदान देत आहेत. सध्या प्रतिष्ठानच्या ६ शाळांसह विविध १२ विभाग असून, गेल्या ३४ वर्षापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्य करीत आहे. आगामी काळात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि भारतीय ज्ञान परंपरा कार्यान्वित करण्यासाठी नवीन कार्यकारी मंडळ कटिबद्ध राहील असा मनोदय नवीन पदाधिकार्यांनी व्यक्त केला.