जळगावताज्या बातम्या

हाॅटेल के. पी. प्राईड जवळील खुल्या भूखंडावर लागलेल्या आगीत हातगाडी जळून खाक

जळगाव, दि.20 (जनसंवाद न्युज): हाॅटेल के. पी. प्राईडच्या बाजुला खुल्या भूखंडावर आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत एक हातगाडी जळाली, खांबावर स्पार्किंग होऊन ठिणगी पडली आणि आग लागल्याचे प्रत्यक्ष दर्शी नागरीकांनी सांगीतले.

त्यानंतर खांबावरील तार तुटून खाली पडली. तारेमध्ये विज प्रवाह सुरू असल्याचे नागरीकांनी सांगीतले. बाजुला वॉचमनची खोली असुन त्या खोली जवळ दोन लहान मुल खेळत होते. सुदैवाने त्यांना काही झाले नाही. नागरिकांनी विजेची तार लाकडाने बाजुला केली. रिक्षा चालक राजु गणपत चौरे यांनी अग्निशमन विभागाला फोन लावला, काहही वेळातच अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले, त्यांनी लगेच आगीवर नियंत्रण मिळवुन पुढील होणार नुकसान टाळल. सुदैवाने कुठलीही मोठी हानी झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button