
जळगाव, दि. ८ (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र बँकेतर्फे बिझनेस अवेअरनेस अर्थात व्यवहारांबाबत जनजागृती करणार असल्याची माहिती क्षेत्रीय प्रबंधक प्रवीणकुमार सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, एक पेड माँ के नाम, स्वच्छता मोहीम याबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. तसेच महाराष्ट्र बँकेला राज्यातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनीही महाराष्ट्र बँकेच्या पारदर्शी व्यवहाराचे कौतुक केले आहे. व्यवहारांच्या जनजागृतीसाठी ग्रामीण भागात ग्रामसभा घेण्याचेही नियोजन असल्याची माहिती प्रवीणकुमार सिंग यांनी दिली. यावेळी – अनिल कुजुजी, विजय दुबे, ऋषीकेश घोरपडे आदी उपस्थित होते.