
जळगाव, दि. 31 जनसंवाद न्युज (प्रतिनिधी): बर्याच क्षेत्रात आता AI टेक्नॉलॉजीचा वापर होऊ लागला आहे. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात आता फोटोग्राफर हि मागे राहणार नाहीत, फोटोग्राफीच्या कलेत आता AI चा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
जळगाव जिल्यातील फोटोग्राफर्स करिता पुण्यातील आणि भारतातील पहिलीच AI अॅकॅडमी, टोड्स सीजीआय अॅकॅडमीने जळगाव पांडे डेअरी चौक जवळील दापोरेकर मंगल कार्यालयात, दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत AI वर आधारित एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सदर कार्यशाळेत AI वर आधारित प्रात्याक्षिके सादर होणार आहेत. ही प्रात्याक्षिके Vfx क्षेत्रात कार्यरत असलेले, वीसवर्षाहून अधिक अनुभव असलेले आणि फ्लाईंग टोडस एंटरटेनमेंट प्रा. लि. चे संस्थापक संचालक श्री.गणेश रेशवाल हे करणार आहेत. त्यांच्या जोडीला टोडस सीजीआय अॅकॅडमीचे सेंटर हेड श्री. रवींद्र पाटील हे करणार आहेत.
अधिक माहितीसाठी विनोद चौधरी ९४२०११३४९२, निलेश जाधव ९६६५०७०७०३, राजेश खेले ७५५९१७७७११ या नंबरवर संपर्क साधावात.
Web site: www.toadsindia.com