जळगावताज्या बातम्याशैक्षणिक
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी

जळगाव, दि. 2 (जनसंवाद न्युज): मेहरूण परीसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजाराम’ व ‘ वैष्णव जन तो तेंनी काहिये जे’ ही दोन भजने गायली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांची महात्मा गांधीजी यांच्या कार्यावर भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मुकेश नाईक सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. शितल कोळी मॅडम यांनी महात्मा गांधींजीचे विचार जीवनात मार्गदर्शक असल्याचे मत मांडले. रूपाली आव्हाड यांनी प्रास्ताविक तर आभार श्रीमती सुवर्णा अंभोरे यांनी मांडले.