
जळगाव, दि. 8 (जनसंवाद न्युज): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींचा संवाद वाढविण्यासाठी शाळेकडून विविध राबविण्यात येत आहे..
शाळकरी मुलांमध्ये पोलिसांबाबतची भीती दूर होऊन, मुलांचा पोलिसांशी संवाद वाढावा यासाठी शाळांमध्ये ” एक राखी सुरक्षितेची एक राखी सन्मानाची” उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेतील मुलीनी दिनेश बडगुजर पोलीस उपनिरीक्षक,दिनेश पाटील पोलीस उपनिरीक्षक यांना राख्या बांधल्या आहेत.
शाळा घेत असलेल्या उपक्रमामुळे त्याचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेला दिसत आहे म्हणून. या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ” हा उपक्रम ठेवण्यात आला आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले शाळांमधील ‘मुलींनी निर्भिडपणे राहिले पाहिजे. अडचणी असतील तर पालक, शिक्षक, पोलिसांना सांगितले पाहिजे,’ असे आवाहन दिनेश बडगुजर पोलीस उपनिरीक्षक यांनी या वेळी केले. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड तर आभार शितल कोळी यांनी मानले. कार्यक्रमाला उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक ,कविता सानप ,साधना शिरसाट, सरला पाटील, सुवर्णा अंभोरे ,शारदा तडवी ,सुवर्णा महाजन ,दिनेश पाटील, निलेश पवार यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.