माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक विद्यालयात प्रज्ञावंत राजाभाऊ ढाले यांची 84 वी जयंती उत्साहात संपन्न

जळगाव, दि. 1(जनसंवाद न्युज): मेहरूण येथील माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये प्रज्ञावंत प्रबुद्ध योद्धा राजाभाऊ ढाले यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य श्रीकांत तायडे, मा.प्राचार्य यशवंत मोरे,सुभाष सपकाळे,अभय सोनवणे यांच्या हस्ते माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.
प्रा.यशवंत मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वैचारिक वारसदार राजा ढाले होते. त्यांच्या विषयी आपले प्रखर विचार मांडले, तसेच विजय सुरवाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी श्रीकांत तायडे यांनी राजाभाऊ ढाले विषयी विचार मांडताना खरे परिवर्तनवादी खंबीर नेतृत्व आणि संघटन करणारे कुशल योद्धा म्हणून राजा ढाले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी केले. आभार प्रदर्शन अभय सोनवणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र बाविस्कर, विजय सुरवाडे, अनिल तायडे, रवींद्र निकम, त्र्यंबक जाधव, यश तायडे यांनी परिश्रम घेतले. राजाभाऊ ढाले यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.