क्राईमजळगावताज्या बातम्या

माजी नगरसेवक बंटी जोशींची आत्महत्या, महिनाभरापासून होते अस्वस्थ

जळगाव, दि. 2 (जनसंवाद न्युज): शहरातील ओंकारेश्वर मंदिर परीसरातील जयनगरमध्ये वास्तव्यास असलेले माजी नगरसेवक अनंत ऊर्फ बंटी जोशी यांनी शुक्रवारी दिनांक 1 रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी जेवणानंतर ते घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत गेले. सायंकाळी उशिरापर्यंत बाहेर न आल्याने त्यांचे कनिष्ठ बंधू आशुतोष यांनी वर जाऊन पाहिले असता, त्यांना ही घटना कळाली. त्यांनी कुटुंबातील अन्य सदस्यांना व पोलिसांना माहिती दिली.

अस्वस्थतेतून टोकाचा निर्णय

बंटी जोशी यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला? याचे कारण समजू शकले नाही. मात्र, महिनाभरापासून ते अस्वस्थ असल्याचे नातेवाईक व मित्रमंडळीतून सांगण्यात आले. बंटी जोशी यांच्या मागे पत्नी, सात वर्षांचा मुलगा राजवीर, आई-वडील, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जोशी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रुग्णालयात त्यांचा मित्रपरिवार, कैलास सोनवणे, सुनील महाजन, नितीन लठ्ठा, विष्णू भंगाळे, शरद तायडे, अरविंद देशमुख, प्रशांत नाईक, रिंकू चौधरी, प्रशांत सुरडकर, जमील देशपांडे, श्यामकांत सोनवणे, आनंद मुजुमदार यांच्यासह नाट्य क्षेत्रातील शंभू पाटील व रंगकर्मी उपस्थित होते.

नाट्यक्षेत्र ते राजकारण

बंटी जोशी महाविद्यालयीन जीवनात व त्यानंतरही काही वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत होते. सुरुवातीच्या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे ते जळगाव शहराध्यक्ष होते. महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही केले. नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. 2018 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग 12 मधून शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button