जळगावकलाताज्या बातम्या

वृत्तपत्र आणि हौशी छायाचित्रकारांसाठी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन, उत्कृष्ठ छायाचित्राला मिळणार पारितोषिक

जळगाव, दि. 28 (जनसंवाद न्युज): येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे वृत्तपत्र छायाचित्रकार आणि हौशी छायाचित्रकार यांच्यासाठी दोन स्वतंत्र गटात सर्वोत्तम फोटो स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी असलेल्या गटात दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक वारसा असलेले छायाचित्र तर हौशी छायाचित्रकार गटासाठी ऐतिहासिक समृद्ध वारसा सांगणारे छायाचित्र अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.

जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती, वृत्तपत्र छायाचित्रकार, पत्रकार यात सहभागी होऊ शकतात. सांस्कृतिक, ऐतिहासिक, ग्रामीण, धार्मिक, स्थापत्य, सामाजिक, खाद्य संस्कृती यापैकी कोणत्याही स्वरूपातील जिल्ह्याच्या किंवा समाजाच्या वारसाचे दर्शन घडविणारे छायाचित्र असावे. प्रत्येक स्पर्धक कितीही छायाचित्र पाठवू शकतात. छायाचित्र १२ बाय १८ आकाराची प्रिंट असावी. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याची अंतिम दि. १० ऑगस्ट असून ११ ते १३ ऑगस्ट निवड प्रक्रिया होणार आहे.

१५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान रिंगरोडवरील पी.एन.गाडगीळ कला दालनात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून २२ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम, माहिती आणि छायाचित्र पाठविण्यासाठी प्रदीप खिवसरा, ३१८ गोलाणी मार्केट हनुमान मंदिरा शेजारी जळगाव, राजेश यावलकर, २२० तहसील कार्यालयासमोरील गल्ली जळगाव,असिफ मेमन ४९ ईदगाह कॉम्प्लेक्स अजिंठा रोड जळगाव
यापैकी कोणत्याही एका ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button