मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंप्राळा परीसरात रक्तदान शिबीर संपन्न
54 रक्तदात्यांनी केले रक्तदान

जळगाव, दि. 22 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराणा प्रताप भाजप मंडल क्र.५ ( पिंप्राळा परिसर) च्या वतीने व जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश दामू भोळे ( राजुमामा ), भाजप जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी, विशालभाऊ त्रिपाठी रक्तदान शिबिराचे संयोजक सागर जिजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सरिता बारी, रूपेश सपकाळे, शांताराम बारी यांच्यासोबत ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी भाजप मंडल क्र.५ ( पिंप्राळा परीसर ) चे अध्यक्ष अतुल बारी, सरचिटणीस उमेश सुर्यवंशी, संदीप मराठे, माजी मंडलाध्यक्ष शक्ती महाजन, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, विजय पाटील, चंद्रशेखर पाटील, महिला मोर्चा च्या रेखाताई कुलकर्णी, शुभांगी बिऱ्हाडे, स्मिता वेद, मंदाताई सोनवणे, जयश्री पाटील, गीता शुक्ला, माधुरी हांडे (देशमुख) मंडल पदाधिकारी दक्षा फाउंडेशन चे अध्यक्ष मीनाक्षी सपकाळे आशिष सपकाळे, राहुल पाटील, राज कोळी,राहुल लोखंडे, संजय तायडे,किरण भोई, अनुराज मराठे, नूर भाई, अंकित कोष्टी, जीभाऊ वानखेडे, व कार्यकर्ते उपस्थित होते.