जळगावताज्या बातम्या

जळगांव विभाग नियंत्रक पदी विजय गीते रुजू

जळगाव, दि. 17 (जनसंवाद न्युज): एसटी महामंडळ जळगाव विभागाच्या विभाग नियंत्रक पदी धुळे येथील विभाग नियंत्रक यांना अतिरिक्त पदभार मिळाल्यामुळे आज रोजी त्यांनी जळगाव विभागाचा पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी विभागातील सर्व आगार व्यवस्थापक व  अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागाची परिस्थिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे प्रवासी हित जोपासून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

एसटी महामंडळ जळगाव विभागातील लिपिक टंकलेखक भरती घोटाळ्याबाबत कामगार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे दिनांक 25 फेब्रुवारी 2025  रोजी तक्रार केलेली होती. त्या अनुषंगाने  विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले होते व विजय गीते यांना अतिरिक्त पदभार सोपविलेला आहे.

       याप्रसंगी भ्रष्टाचार निवारण समिती व एसटी कामगार सेनेकडून विजय गीते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना कामगार सेनेचे आर के पाटील यांनी  जळगांव विभागात देखील धुळे पॅटर्न राबवून जळगाव विभागाचा नावलौकिक करावा अशी विनंती केली. एसटी महामंडळाच्या प्रगतीसाठी सर्व संघटना कायमस्वरूपी प्रशासनासोबत राहतील असे प्रतिपादन गोपाळ पाटील यांनी केले. याप्रसंगी भ्रष्टाचार निवारण समितीचे सुरेश चांगरे, दिलीप सूर्यवंशी, अजमल चव्हाण, सुनील विसावे व जयवंत अहिरे उपस्थित होते. विभाग नियंत्रक विजय गीते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button