
जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे दिनांक 26 /06/2025 रोजी मा. श्री. मंगलदास किसन मोरे निसर्ग कवी यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यान निसर्गा विषयी जनजागृती करून उत्तम असे मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्राची ओळख त्यांनी आपल्या स्वयं रचित कवितेतून सुंदर अश्या प्रकारे विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या.
श्री. मंगलदास किसन मोरे यांनी निसर्गावीषयी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली. निसर्ग सुंदर आहे आणि त्याला सजावटीची गरज नाही या कल्पनेवर भर देण्यात आला आहे. कवी मंगलदास मोरे यांनी शाळेच्या इको क्लब तर्फे चालविण्यात येणारे सीड बँकेला १००० झाडांच्या बिया देऊन शाळेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या . शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.