गोलाणी मार्केटमध्ये दुकान मालकाकडून युवकाला बेदम मारहाण, चार ते पाच जणांनी मिळून मारल्याचे युवकाचा आरोप

जळगाव, दि. 9 (जनसंवाद न्युज): गोलाणी मार्केट मध्ये आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका दुकानदाराने चार ते पाच जणांनी मिळून एका ग्राहकाला बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना गोलाणीमार्केट मध्ये प्रचंड गर्दी जमली होती. मारहाण केल्यामुळे त्या मुलाचे कपडे फाटले होते व तोंडातून रक्त येत होते. अशाच फाटलेल्या वेशात तो तरूण शिव्या देत जात होता. गोलाणी मार्केट मध्ये प्रचंड गर्दी जमल्याने काही दुकानदारांनी घाबरून पटापट आपली दुकाने बंद केली होती.
घटनास्थळावरून माहिती घेतली असता कळाले की दिनेश चौधरी या तरुणाचा वाढदिवस होता. मित्रा सोबत गोलाणी मार्केट मधील फेमस मोबाईल दुकानावर वस्तु घेण्यावरून वाद झाला. दुकान मालकाने आणि अजुन चार ते पाच जणांनी दिनेश चौधरी याला बेदम मारहाण केली. हि वार्ता पोलीसांना कळाल्यावर थोड्याचवेळात पोलीस दाखल झाले. मारहाण झालेल्या युवकाने पोलीसांना हकीकत सांगीतली की मला चार ते जणांनी मिळून मारहाण केली. मारहाण झालेला युवक व पोलीस दुकानमालकाकडे गेले असता दुकान मालक दुकान बंद करून फरार झाला होता. शेवटी सबंधीत पोलीसांनी युवकाला गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले.