जळगावराष्ट्रीय

वयाच्या 21व्या वर्षी सैन्यदलात भरती झालेल्या युवकाचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

जळगाव, दि. 7 (जनसंवाद न्युज): विसपुते चारुदत्त संतोष हा वयाच्या 21 व्या वर्षी भारतीय सैन्य दलात अग्नीवीर म्हणून भरती झाला आहे. त्याचे स्वप्न होते की एक दिवस मी सैनिक होईल आणि देशाची सेवा करेल. ते स्वप्न साकार झाले आहे. मेहरूण परिसरातील माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी त्याचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.

तो लवकरच देशसेवेसाठी रुजू होणार आहे. जळगाव येथे नुतन महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या चारुदत्तने  2024 मध्ये  मैदानी परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला व त्याची  2024 ला अग्निवीर पदासाठी नियुक्ती झाली.मध्य प्रदेश येथे 05 जुन रोजी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कारगील येथे आपल्या देशासाठी सशस्त्र सेवा बजावणार आहे. सीमेवर सेवेसाठी जाण्याअगोदर आपल्या गावी आलेल्या विसपुते चारुदत्त संतोष या अग्निवीर सैनिकाचे ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत, ध्वनीक्षेपकावरून देशभक्तीपर गाणी वाजवत, गुलाल उधळत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली.

यावेळी बंडु वाणी , ज्ञानेश्वर आंधळे, किशोर नेमाडे, भिकन पाटील, विनोद शेवाळे, मुकेश नाईक, संजय देवरे, भारत पाटिल, शरद पाटील, निलेश कासार, कल्पेश सोनार, राजेश बनछोडे, विजय कासार ,तुषार नेमाडे, गोलु पांडे, मोंटि राजपुत, अनिकेत चौधरी, गौरव सोनार, सर्व धारकरी, परिसरातील सर्व माता भगिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button