जळगावराजकीय

मनसे शहर उपाध्यक्षपदी ललित शर्मा व श्रीकृष्ण मेंगडे यांची नियुक्ती

जळगाव, दि.7 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव मध्ये नवीन दोन शहर उपाध्यक्ष अनुक्रमे श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, यांची नियकुती करण्यात आली. मनसे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

नियुक्तीवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहराध्यक्ष किरण तळले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, चेतन पवार, संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, ॲड सागर शिंपी, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, महेंद्र सपकाळे, सतीश सैंदाणे, हर्षल वाणी, सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते .

जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक लढण्यासंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली व पक्ष बांधणी व संघटन यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button