कृषीजळगाव

विदेशी पाहुण्यांची भोकर येथील अॅड. सचिन पवार यांच्या नाविन्यपूर्ण कांदा शेतीस भेट

जळगाव, दि. 23 (जनसंवाद न्युज): कांदा शेतीवर अभ्यासासाठी आलेले जपान येथील यासुमा कंपनी लि.जपान चे संचालक -कियोशी काटो, महाव्यवस्थापक-तकाशी इशिकावा, सहायक व्यवस्थापक-युमी वातानाबे,सहायक गटनेता-हिरोयुकी होरीकावा, DKSH कंपनी जापान चे व्यवस्थापक शिरीची इचिमुरा यांनी भोकर येथील सचिन पवार यांच्या शेतात जाऊन कांदा पिकाची पाहणी केली व सदर पिकाची लागवडीची, निगराणीची तसेच काढणीची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर पवार यांच्या राहत्या घरी जाऊन  विविध तंत्रज्ञानावर सविस्तर चर्चा करून माहिती आदान प्रदान केली. पवार कुटुंबियांनी भारतीय व महाराष्ट्रीयन संस्कृती जपत सर्व विदेशी पाहुण्यांचे रुमाल, टोपी, नारळ व पुष्प देऊन सत्कार केला. तसेच जैन उद्योग समूहाचे अधिकारी वर्ग यांचाही सत्कार करण्यात आला.

पवार कुटुंबातील सदस्यांनी रुमाल टोपी बुके देऊन महाराष्ट्रीयन पध्दतीने सत्कार केल्याने विदेशी पाहुणे भारावून गेले. आम्ही परत आपल्या भेटीसाठी येऊ असे म्हणत निरोप घेतला.

सदर कार्यक्रमास जैन फार्म फ्रेश मार्केटिंग विभागातील प्रमुख श्री रोशन शहा, करार शेती विभागातील प्रमुख श्री गौतम देसार्डा, श्रीराम पाटील व भा.ज.पा.जेष्ठ नेते प्रभाकर पवार, सर्व परिवार व सहकारी उपस्थित होते.
गावात विदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे भोकर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button