
जळगाव, दि. 30, जनसंवाद न्युज (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या अपघात मालिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जळगाव तर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे त्यात काही नागरिकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे तरी देखील प्रशासन हे महामार्गावरील खड्डे बुजवून महामार्ग सुरळीत करण्यात अपयशी ठरत आहे.
दोन दिवसापूर्वी मानराज पार्क येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका अपघातात १७ वर्षीय तरुणी व २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, मागील महिन्यात आकाशवाणी चौक येथे एक नागरिकाचा मृत्यू झाला. असे अनेक अपघात घडत आहे सदर महामार्गाची दुरुस्ती बद्दल व आकाशवाणी चौक येथील अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या सर्कल विरोधात अनेक निवेदने जिल्हाधिकारी आणि न्हाई अधिकाऱ्यांना देऊन देखील कुठलीही दाखल न घेतल्याने या अपघातांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा रस्त्यावर उतरला होता.
सदर आंदोलनात अनिल पवार यांनी यमराज ही भूमिका बजावून नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळेस न्हाई प्रशासनाचा निषेध असो बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा निषेध असो महामार्गावरील बळी थांबलेच पाहिजे आकाशवाणी चौकातील सर्कल हटवलेच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या.
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष इजाज मलिक जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, जिल्हा प्रवक्ते वाल्मीक पाटील, नामदेव चौधरी, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी, महानगर कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी, महानगर कार्याध्यक्ष सचिन पाटील, वाय एस महाजन, अशोक पाटील,गौरव वाणी, राजू मोरे, किरण राजपूत, रमेश बहारे, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, आकाश हिवाळे, चेतन पवार, हितेश जावळे, भाऊराव इंगळे, संजय चव्हाण, लिला रायगडे, मीनाक्षी चव्हाण, सीमा रॉय, अंजली पाटील, राजेश गोयर,गोपाल पांचावणे, हसन खान, रियान खान, मुगीर खान, अनिल हिरोडे, अजय, समीर खान आदी उपस्तीत होते.