जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

कोणताही क्लास न लावता नूतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

जळगाव, दि.11 (जनसंवाद न्युज): नूतन मराठा महाविद्यालयाची गरीब विद्यार्थ्यांचे मायबाप काॅलेज म्हणुन ओळख आहे, कारण शहरात कुठेच एडमिशन नाही मिळाली की नुतन मराठा महाविद्यालयात नक्कीच मिळेल अशी खात्री प्रत्येक विद्यार्थ्याला असते. अशा या नुतन मराठा महाविद्यालयाचा  BSc physics चा विद्यार्थी प्रितेश मुकुंदा सोनवणे MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI झाल्याबद्दल महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण प्रतापराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रितेश सोनवणे याने सांगितले की, मी कुठल्याही प्रकारचे बाहेरचे क्लासेस न लावत स्वतः अभ्यास करुन MPSC परीक्षा उत्तीर्ण झालो. माझ्या या यशाबद्दल माझे पालक यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले, तसेच नूतन मराठा महाविद्यालयाने व प्राध्यापकांनी मला वेळोवेळी खूप मदत केली, यामुळे माझं मनोधैर्य कायम उंचावत राहिले. प्रितेश सोनवणे याच्या उतुंग भरारीसाठी महाविद्यालयाने त्याचा सत्कार केला. या सत्कार प्रसंगी उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, प्रा. आर.बी .देशमुख, प्रा. सुभाष वानखेडे यांनी त्यांच्या अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button