आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या संजय आवटे यांचे जाहिर व्याख्यान, सात दिवस भरगच्च कार्यक्रम

जळगाव, दि. 6 (जनसंवाद न्युज): भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती संपुर्ण भारतभर साजरी होत आहे. जळगाव येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात जयंती साजरी होणार असून 7 एप्रिल पासुन ते 14 एप्रिल पर्यंत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
7 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता लेवा भवन येथे संजय आवटे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम होईल तसेच भिम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. 8 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. आकाशवाणी चौक ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संविधान जागर यात्रा काढण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे हि स्पर्धा संध्याकाळी 5 वाजता रामदास काॅलनीतील झाल्टे प्रतिष्ठान अभ्यासिका येथे संपन्न होईल. या स्पर्धेसाठी ज्यांना नावे नोंदवायची आहेत त्यांनी हरिश्चंद्र सोनवणे मो. 9422772280 यांच्याकडे नोंदवावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
11 एप्रिल रोजी महिलांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून हि रॅली शिवतीर्थ मैदानापासुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत असेल. 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता पिंप्राळा येथील शिवाजी चौकात महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी 11 वाजता पोलीस भरती व सराव परिक्षेसाठी लागणारे पुस्तक आणि साहित्य विनामुल्य दिले जाणार आहे. हा कार्यक्रम गणेश काॅलनी येथील दर्जी क्लासेस येथे संपन्न होणार आहे. 13 तारखेला सकाळी 8 वा. भाऊंच्या उद्यानात विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा घेण्यात येईल यासाठी नाव नोंदणीसाठी विनोद सपकाळे मो. 9923934900 याच्याशी संपर्क साधावा. याच दिवशी रात्री 8 ते 12 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लाईटींग शो दाखवण्यात येणार आहे. आणि 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वा. सर्व जातीधर्माची भव्य मिरवणूक निघणार आहे.
यावेळी समितीचे सदस्य राधे शिरसाठ, सुशिल अडकमोल, भारती रंधे, सतीश गायकवाड, चंद्रमणी मोरे, नितु इंगळे, सचिन सरकटे, त्रुशाल सोनवणे, हरिश्चंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.