मंत्री गिरीष महाजन यांच्या डोक्याला दुखापत, उपचारानंतर नाशिककडे रवाना

जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना वरणगाव येथे जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी जात असताना अपघात झाला. पार्थिवाच्या दर्शनासाठी लष्कराच्या ट्रकमध्ये चढत असताना, ट्रकवरील लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला जोरात लागला. यामुळे त्यांना इजा झाली. अर्जुन बावस्कर यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सम्राट नगरातून बाजार समितीच्या मोकळ्या जागेत रेल्वेस्थानकाच्या मुख्य मार्गाने आणण्यात येत होते. त्या वेळी महात्मा गांधी विद्यालयासमोर मंत्री महाजन पार्थिवावर पुष्पचक्र ठेवण्यासाठी लष्कराच्या वाहनावर चढत असताना, गाडीवर असलेले चॅनल त्यांच्या डोक्याला जोरात लागले. त्यामुळे त्यांना इजा झाली. त्यांच्यावर तत्काळ येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर ते महत्त्वाच्या बैठकीसाठी नाशिक येथे रवाना झालेक.