पुतळा सुशोभिकरणाच्या मागणीसाठी सार्वजनिक उत्सव समितीचा मनपावर धडक मोर्चा

जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व सकल बौद्ध समाज बांधवांतर्फे बुधवारी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. पंधरा दिवसापूर्वी समितीतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण करणे तसेच फोल्डिंग जिना बसवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. परंतु महानगरपालिकेतर्फे कोणतंही पाऊल उचललं गेलं नसल्याकारणाने बुधवारी समितीतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला.
येणाऱ्या पाच एप्रिल पर्यंत सुशोभीकरण तसेच फोल्डिंग जिना बसवून नाही मिळाला तर महानगरपालिकेच्या बाहेर तीव्र आंदोलन तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला म्हणून समितीतर्फे याचिका दाखल केली जाईल असा अल्टीमेटम समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी आयुक्तांना दिला.
आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पाच तारखेच्या आत सुशोभीकरण तसेच फोल्डिंग जिना बसवण्यात येईल अशा प्रकारे आश्वासित केले, तसेच अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्या निमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड, उपाध्यक्ष भारती रंधे, उपाध्यक्ष मोनू अडकमोल, कार्याध्यक्ष चंद्रमणी मोरे, खजिनदार सचिन सरकटे, सहसचिव त्रुशाल सोनवणे, सचिव नीलू ताई इंगळे, सदस्य संगीता मोरे, रिटा तायडे, प्राजक्ता तायडे, अभिजीत रंधे, प्रतिभा शिरसाठ, मिलिंद निकम, हरिश्चंद्र सोनवणे, मंगल शिरसाठ, निलेश परदेशी, इस्माईल खाटीक, राजू डोंगरे, अनिल पेंढारकर, बबलू पेंढारकर, चंद्रकला पेंढारकर, पिंकी पेंढारकर, मेघा सोनवणे, नंदा सोनवणे, माया निकम, राजू बाविस्कर, सोनू निकम, अजय पेंढारकर, बुद्धम बाविस्कर, संदीप वाघ आदी समाज बांधव उपस्थित होते.