
जळगाव, दि. 26 (जनसंवाद न्युज): शहर क्षयरोग केंद्रामार्फत महानगरपालिकेच्या सभागृहात जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. रोटरी गोल्ड सिटी क्लब व शहर क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना फूड बास्केट चे वाटप करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त वैष्णवी गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ विजय घोलप, क्षयरोग विभागाचे जिल्हा समन्वयक कमलेश आमोदेकर, सिव्हिल हॉस्पिटल चे चेस्ट विभाग प्रमुख डॉ पुजारी, डॉ स्वप्निल चौधरी, डॉ कल्पेश गांधी व रोटरी गोल सिटी क्लब चे अध्यक्ष विनय बंसल तुषार जाखेटे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फूड बास्केट चे वाटप करण्यात आले त्यानंतर हंड्रेड डेज कॅम्पिंग ची सांगता तसेच आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला. क्षयरोग केंद्राचे आतापर्यंत झालेले काम दिनांक 10 मार्च ते 22 मार्च 2025 पर्यंत एस एफ मध्ये झालेले काम याविषयी सविस्तर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व NTEP कर्मचारी वैद्यकीय अधिकारी जी एन एम, ANM कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वय कमलेश्वर आमोदेकर प्रस्तावना डॉक्टर विजय घोलप व आभार दीपक नांदेडकर यांनी मांडले.