अपघातजळगावताज्या बातम्या

शिवाजीनगर पुलावरून रिव्हर्स आलेल्या ट्रकखाली तीन रिक्षा आणि पाच मोटारसायकलींचा चुराडा, चार जण जखमी

जळगाव, दि. 22 (जनसंवाद न्युज): सिमेंटने भरलेला लोडेड ट्रक शिवाजीनगर पुलावरून रिव्हर्स येऊन रिक्षा स्टाॅपवर थांबलेल्या तीन रिक्षा आणि पाच मोटारसायकली दाबल्या गेले. या घटनेत चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. हि घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की ट्रक क्रमांक MH 19 CY 7745 हा सिमेंट घेऊन शिवाजीनगर पुलावरून टावरचौकाकडे जात असताना चढतीवर ट्रक जात असताना ट्रक पुढे न जाता तो मागे रिव्हर्स येऊ लागला. पुलाजवळ दत्तमंदिर आहे त्या मंदिरा जवळ रिक्षा स्टाॅप आहे. बाजुला मोठे झाड आहे त्या झाडाखाली एक नाश्त्याची गाडी आणि मोटारसायकलीसह काही नागरीक उभे होते. ट्रक रिव्हर्स येऊन डायरेक्ट रिक्शा आणि मोटारसायकल वर धडकली त्यात तीन रिक्षांचा अक्षरशः चुराडा झाला आणि पाच मोटारसायकली दाबल्या गेल्या.
त्यामध्ये पल्सर: MH 19 EM 4268, स्पेंडर: MH 19 EK 9814, ज्यूपिटर: MH 19 DU 7865, रिक्शा : MH 19 V 8971, MH 15 AK 5312, MH 19 v 9202, एक पल्सर बिना नंबर प्लेटची होती. यामध्ये चार नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button