जळगावताज्या बातम्या

बांधकाम अभियंता प्रशांत सोनवणेंची बदली

आमदार एकनाथ खडसे यांनी शासनाकडे तक्रारी करत केली होती चौकशीची मागणी

जळगाव, दि.18 (जनसंवाद न्युज): सार्वजनिक बांधकाम विभागाचे जळगावातील अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची छत्रपती संभाजीनगरला नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे अधीक्षक अभियंता या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. प्रशांत सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता म्हणून जळगावात पदभार स्वीकारला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती होऊन नंतर नाशिकला बदली झाली होती. या बदलीस स्थगिती घेऊन ते पुन्हा जळगावी रुजू झाले. त्यांच्याच कार्यकाळात विशेषतः जळगाव शहरातील रस्त्यांसाठी जवळपास दोनशे कोटींहून अधिक निधी मिळाला. शिवाजीनगर उड्डाणपुलासह इतर कामेही बऱ्यापैकी मार्गी लागली. मात्र, या विभागातील कथित गैरव्यवहार, श्री. सोनवणे यांनी गेल्या काळात केलेले परदेश दौरे या संदर्भात माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी शासनाकडे तक्रारी करत चौकशीची मागणी केली होती. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडसेंनी सोनवणेंच्या चौकशीबद्दलची लक्षवेधी सूचनाही ५ मार्चला दिली होती. त्यावर चर्चा, कामकाज होण्यापूर्वीच मंगळवारी शासनाने श्री. सोनवणे यांची बदली केली. शासनाचे अवर सचिव डी. व्ही. खारके यांच्या स्वाक्षरीने काढलेले बदली आदेश मंगळवारी मिळाले असून, नव्या नियुक्तीच्या जागी सोनवणेंना तातडीने पदभार स्वीकारायचा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button