मेहरूण येथील विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन संपन्न

जळगाव, दि.15 (जनसंवाद न्युज): मेहरूण येथील विचार वारसा फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवक-युवतींसाठी धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. यामध्ये महिलांच्या सन्मान संदर्भात संदेश देण्यात आला. शुक्रवारी दि. १४ रोजी विचार वारसा फाउंडेशन चौक, मोठी पाण्याची टाकी, रामेश्वर कॉलनी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
सुरुवातीला फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर पर्यावरणपूरक रंग वापरून धूलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. प्रसंगी विविध गीतांच्या जल्लोषात तरुण-तरुणांनी ठेका धरून उत्साह दाखविला. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मेहरूण परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी विचार वारसा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष देशमुख, मयुर डांगे, मनिष चौधरी, आकाश तोमर, संकेत म्हस्कर, अभिजित राजपूत, ऋषिकेश राजपूत, निखिल शेलार, गौरव डांगे, अमोल ढाकणे, अजय मांडोळे, चेतन राजपूत, आदींनी परिश्रम घेतले.