श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाणे शिवार येथील विद्यार्थ्यांचे MTS स्पर्धेत घवघवीत यश

जळगाव, दि.15 (जनसंवाद न्युज): के. नारखेडे कॉम्पुटर टेक्नॉलॉजी संस्था भुसावळ, यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या MTS या स्पर्धा परीक्षेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आव्हाणे शिवार जळगाव येथील इयत्ता ७वी ची विद्यार्थीनी कु. खुशी अजय शिंदे हिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला तसेच चि. ध्रुव सुनील पाटील. याचा केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक आला, कु. चंद्रमा चंद्रकांत सोनवणे हिचा शाळास्तरावर प्रथम क्रमांक तसेच इयत्ता ४थी वर्गाची विद्यार्थीनी कु.अभिलाषा रुपेश गाडे. केंद्र स्तरावर प्रथम, चि. दर्शन प्रभाकर पाटील.
शाळास्तरावर प्रथम क्रमांक आला. तसेच विद्यालयाच्या २९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य पटकाविले आहे.
संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार आत्माराम पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली हंसराज शिंदे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.