
चोपडा, दि.1 (जनसंवाद न्युज): तालुक्यातील आकुलखेडा येथील माजी सरपंचाच्या घरासमोर उभी दुचाकी ट्रॅक्टर नेण्यास अडसर ठरत असल्याच्या रागातून हाणामारी झाल्याची घटना घडली. ट्रॅक्टर चालकासह त्याच्या कुटूंबीयांनी घरात घूसून मारहाण केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चोपडा तालूक्यातील आकुलखेडा येथील शेतकरी आनंद लोटन चौधरी(वय-६६) हे गावचे माजी सरंपच आणि प्रतिष्ठीत ग्रामस्थ आहे.पत्नी मिनाबाई, मुलगा योगेश, अनंत अशांसह एकत्र कुटूंबात ते वास्तव्यास असून दोन्ही मुलं उच्च शिक्षीत असल्याने आधुनिक शेती करतात. त्यांच्याच घरा समोर, रविंद्र पांडू पाटील यांचे घर असून त्यांनी घरा शेजारीच ट्रॅक्टर लावण्याचे शेड तयार केले आहे. राहत असलेली गल्ली निमुळती आणि अरुंद असल्याने गल्लीत मोठे वाहन आत पर्यंत आणणे जिकरीचे आहे. कारण गल्लीतील लहानमुले, महिलांचा वावर असल्याने ग्रामस्थांनी रविंद्र पाटिल यांना ट्रॅक्टर गल्लीत आणण्यावरुन अनेक वेळेस वाद निर्माण झाले आहे. मात्र, तरी सुद्धा रहिवाश्यांना त्रास व्हावा या उद्देशाने त्रास दिला जातो. घटनेच्या दिवशी बुधवार(ता.२६) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास माजी सरपंच आनंद लोटन चौधरी यांच्या दाराशी दुचाकी उभी होती. त्याच वेळेस रविंद्र पाटिल हा ट्रॅक्टर(एम.एच.१९.सीसी६१५)घेवुन गल्लीत आला. दुचाकी काढण्यावरुन घराकडे पाहुन शिवीगाळ करत असल्याने, त्यास मी, वाहन काढण्यासाठी चावी आणतो थांब असे सांगीतल्याचा राग येवून मिलींद रविंद्र पाटिल,सागर रविंद्र पाटिल अशा देाघा भावांनी विनाकारण शिवीगाळ करून घरात शिरकाव केला. आनंद चौधरी, मिनाबाई या वयोवृद्ध दाम्पत्यासह त्यांचा मुलगा योगेश यास बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आनंद चौधरी यांच्या बरगड्यांना जबर दुखापत होवुन हात मुरघळला असून, योगेश चौधरी यांच्या हाताला दुखापत करण्यात आली. जखमींना साईल चौधरी, चेतन चाधरी या ग्रामस्थांनी तातडीने जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींचा जबाब घेतल्यानंतर चोपडा पेालिसांत दिलीप रविंद्र पाटिल, सागर रविंद्र पाटिल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक एम.डी. साळवे करत आहेत. जखमींवर उपचार करण्यात येत आहे.