
जळगाव, दि.4 (जनसंवाद न्युज): जळगांव शहर विधान सभा मतदार संघात झालेल्या निवणूकीत मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनवर हरकत घेत बुधवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, शहरातील महात्मा गांधी उद्यानापासुन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, आता पार पडलेल्या १३ जळगांव शहर विधान सभा मतदार संघात ची प्रक्रिया झाली त्यामतदान प्रक्रियेत जे इलेक्ट्रानिक मशिन (E.V.M., C.U., B.U., V.V. Pat) वापरण्यात आले त्याआधारावर जो निकाल देण्यात आला हा पूर्णपणे संशयास्पद असून आमची त्याला हरकत असून त्याबाबत तिव्र निषेध आहे.
कारण दि.२३/११/२०२४ रोजी जो निकाल देण्यात आला, जी मतमोजणी झाली त्या मतमोजणीच्या वेळी बरेच E.V.M. मशिन हे चुकीचे संकते दिर्शवित होतो. (incorrect Number) तसेच ज्या प्रभाग निहाय व बुथ निहाय मतांची संख्या जाहीर करण्यात आली ती सामान्य जनतेने लोकशाहीवर विश्वास ठेवून त्यांचा मतदानाचा हक्क बजविला आहे त्या मतदानातून योग्य उमेदवार निवडण्यासाठी सहकुटूंब बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला तोच उद्देश व सामान्य जनतेचा हक्क E.V.M. व C.U. द्वारे हिरावून घेण्यात आलेला आहे. शासन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नशिल असते. मतदाराने मतदानासाठी बाहेर यावे यासाठी जनजागृती करते. परंतु अशा घेतलेल्या मतदानामुळे टक्का कमी होण्याची भिती वाढलेली आहे.
सदर मतमोजणीच्या दिवशी E.V.M. वर हरकत घेतल्या नंतर V.V. Pat ची मोजणी करण्यात उपस्थित निवडणूक निरीक्षक व इतर अधिकारी यांनी त्यास नकार देवून E.V.M. द्वारे मतमोजणी चालू ठेवली. हे सुध्दा संशयास्पद आहे. तरी मतमोजणीच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी जो काही गैर प्रकार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी व मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.