रमाबाई जयंतीनिमित्त राजमालतीनगर येथुन उद्या भव्य मिरवणूक

जळगाव, दि. 6 (जनसंवाद न्युज): रमाबाई जयंती निमित्त राजमालतीनगरातील नालंदा बुध्द विहार समितीतर्फे उद्या दिनांक 7 रोजी संध्याकाळी 6 वा. भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक नालंदा बुध्द विहार येथुन निघुन दुध फेडरेशन, शिवाजीनगर, टावरचौक, नेहरू चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने जाणार आहे. समितीमध्ये अध्यक्ष मुकेश जाधव, उपाध्यक्ष मिलिंद विहाडे, खजिनदार आशुतोष मेढे, सचिव राहुल खुळे, डेकोरेशन अध्यक्ष निलेश पारेराव, सहसचिव आकाश थोरात आदींचा समावेश असून कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
रमाबाई यांच्याबद्दल माहिती:
माता रमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी, 1898 रोजी झाला होता. त्यांना रमाई, रमा, रामू अशीही टोपणनावे होती. रमाबाईंचे ४ एप्रिल १९०६ रोजी मुंबईतील भायखळा येथील भाजी मार्केटमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह झाला. त्यावेळी बाबासाहेबांचे वय 15 आणि रमाबाई नऊ वर्षांच्या होत्या. रमाबाईचे प्रेमळ नाव “रामू” होते, तर रमाबाई बाबासाहेबांना “साहेब” म्हणायची. त्यांना पाच मुले होती – यशवंत , गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) आणि राजरत्न. रमाबाईचे 27 मे, 1935 रोजी निधन झाले.
रमाबाईंचे डाॅ.बाबासाहेबांबद्दल कार्य:
◾️रमाबाईंनी बाबासाहेबांना भारतीय कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते म्हणून घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
◾️रमाबाईंनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली.
◾️रमाबाईंनी आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका अपार कष्टाने पार पाडल्या.
◾️रमाबाईंनी बाबासाहेबांना त्यांच्या संघर्षात प्रोत्साहन दिले.
◾️रमाबाईंवर अनेक चरित्रात्मक चित्रपट आणि पुस्तके आहेत.