
जळगाव, दि. 29 (जनसंवाद न्युज): ऑरेंजसिटी लिसेस प्रा. लि. नागपूर स्थित स्टार्टअप, आणि रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (RCC) यांनी एकत्रितपणे गावा गावातील घराघरात ऑरगॅनिक शेती चळवळ सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी हे स्टार्टअप जैव-उत्तेजक (जैविक खते) आणि जैव-कीटकनाशक यांसारखी नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करत आहे. संशोधन, विकास आणि पर्यावरणपूरक कृषी निविष्ठांच्या निर्मितीला समर्पित या संस्थेने दोन पेटंट केलेली उत्पादने विकसित केली आहेत, जी RCC च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गावागावात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
संशोधित उत्पादने
1. PianTaboost (पेटंटेड जैव-उत्तेजक)
2. PiantaProtekt (जैव-कीटकनाशक)
चळवळीचा उद्देश
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील मुख्य कारणांमध्ये पिकाला मिळणारा कमी भाव आणि वाढत्या खतांच्या किमती असल्याचे दिसून येते. याला अनुसरून, ऑरेंजसिटी लिसेस आणि RCC च्या सहकार्याने कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावे यासाठी ही उत्पादने विकसित केली गेली आहेत. ही उत्पादने “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातील.
चळवळीचे मुख्य ध्येय
प्रत्येक गावापर्यंत ऑर्गनिक शेतीचा प्रचार व प्रसार.
जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांची साखळी तयार करणे.
या साखळीतील शेतकऱ्यांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवणे. रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया प्रत्येक गावात एक प्रतिनिधी नेमणार असून, हा प्रतिनिधी शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण देईल आणि PianTaboost व Pianta Protekt ही उत्पादने सहज उपलब्ध करून देणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानाला साथ, ही चळवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान व भारताला ऑर्गनिक राष्ट्र बनवण्याच्या मिशनशी सुसंगत आहे. जैविक उत्पादने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठ निर्माण करणे हा देखील या चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे.
उत्पादनांचे फायदे
1. 100% रासायनिक-मुक्त शेती:
PianTaboost आणि Planta Protekt 100% रसायनमुक्त आहेत आणि खाद्यपदार्थांपासून तयार केली गेली आहेत. डीएपी, एनपीके आणि युरियासारख्या रासायनिक खतांची गरज नाहीशी करून, बियाण्यापासून कापणीपर्यंत या उत्पादनांचा वापर करता येतो.
2. शाश्वत शेती
रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक टाळून पर्यावरणपूरक शेतीसाठी हे उत्पादने उपयुक्त आहेत.
3. किफायतशीर व परिणामकारक
शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे, पीक उत्पादकता वाढवणे, आणि मातीचे आरोग्य टिकवणे यासाठी ही उत्पादने प्रभावी आहेत.
4. पिकांचे संरक्षण
कीड व रोगांपासून पिकांचे रक्षण करून पीक निरोगी व टिकाऊ बनवतात.
शेतकरी-केंद्रित दृष्टिकोन
रुरल चेंबर ऑफ कॉमर्स व ऑरेंजसिटी लिसेसने शेतकऱ्यांचे संघर्ष समजून घेत, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना लक्ष्य केले आहे. या समस्यांवर उपाय म्हणून PianTaboost आणि PiantaProtekt ही उत्पादने संपूर्ण संशोधनातून विकसित केली आहेत.
धोरणात्मक भागीदारी
ऑरेंजसिटी लिसेस व रुरल चेंबर ऑफ कॉमर्स यांची भागीदारी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत शेतीसाठी नवा पायंडा घालणे यावर केंद्रित आहे. RCC च्या माध्यमातून या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा प्रचार व प्रसार केला जाईल.
भविष्याचा दृष्टीकोन
PianTaboost आणि PiantaProtekt ही उत्पादने कमीत कमी खर्चात आधुनिक जैविक शेतीला चालना देत शेतकऱ्यांना शाश्वत व किफायतशीर शेतीचे नवे पर्याय उपलब्ध करून देत आहेत.