उद्यापासून शिवतीर्थ मैदानावर रंगणार संत सावता माळी प्रमियर लीगचा थरार, जिल्हाभरातून अठरा संघांचा सहभाग

जळगाव, दि. 28 (जनसंवाद न्युज): 29 जानेवारी पासून पाच दिवसीय माळी समाजाची भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व-४ थे जळगाव येथील शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) जळगाव येथे मोठ्या उत्साहात सुरुवात होणार असून यामध्ये समाज ऐक्याचा संदेश समाजाच्या वतीने दिला जाणार आहे. तसेच क्रीडा स्पर्धेनिमित्त समाज भावना एक व्हावी, सर्वांचे एकत्रीकरण व्हावे, खेळाडू यांना प्रोत्साहन मिळावे,खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी समस्त माळी समाज तर्फे आयोजन करण्यात येते.
समाजातील उद्योजक, व्यवसायीक,सामाजिक क्षेत्रातील समाज बांधवांनी संघ प्रायोजकत्व स्विकारले. संत सावता माळी प्रीमियर लीग मध्ये १८ संघ खेळणार आहे. यात शक्ती इंडियन जळगाव, YM ग्रुप जळगाव, शिवबा प्रतिष्ठान जळगाव, सिद्धेषा स्ट्राईकर्स जळगाव, सुपर बॅटरी किंग जळगाव, सावता ११ जळगाव, त्रिमूर्ती स्पार्टन जळगाव, गजानन फार्मा वारियर्स जळगाव, डीएम ग्रुप एरंडोल, सावता माळी क्रिकेट टीम चोपडा, क्रांतीज्योती वारियर्स धरणगाव, क्षत्रिय सावता माळी समाज रावेर, फुले वॉरियर्स नशिराबाद, माळी ११ भुसावळ, माळी योद्धा रिंगणगाव, माऊली आर्यन्स आसोदा, फुले सुपर किंग जामनेर,आराध्या डेव्हलपर्स पाळधी या संघांनी सहभाग घेतला आहे. सर्व आयोजन समिती रात्र दिवस मेहनत करून एवढं मोठे आयोजन करत असते.त्यामुळे सर्व क्रीडा प्रेमी, प्रेक्षक, समाज बांधव यांनी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे.