मानव अधिकार संरक्षण समितीच्या जळगाव शहरअध्यक्ष पदी सतीश गायकवाड यांची निवड

जळगाव, दि 31 (जनसंवाद न्युज): जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच परिवर्तन ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत उर्फ सतीश मिलिंद गायकवाड यांची नुकतीच मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली तर्फे जळगाव शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष भगवानभाई दाठीया यांच्या आदेशानुसार निरीक्षक जळगाव जिल्हा निरीक्षक डॉ विजय बापू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे. सतीश गायकवाड हे नेहमीच समाजहिताची काम करीत असतात बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात मोर्चे आंदोलन करून, शासनाचे लक्ष वेधत असतात. त्यांच्या याच कामाची पोहच म्हणून त्यांची मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीच्या
जळगाव शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे. दरम्यान या निवडीमुळे समाजातून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.